भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून येणार आहेत. आज कुणीतरी पावसात भिजलं तरीही त्याचा कोणताच परिणाम होईल असं मला वाटत नाही, असा अप्रत्यक्ष टोला भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लगावला आहे. आज विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्ष उमेदवारांची खासदार राऊतांनी कितीवेळा अब्रु घालवली आहे, जो काही निकाल आहे तो काही वेळात समोर येणार आहे, असंही ते म्हणाले आहेत.
#SharadPawar #GopichandPadalkar #BJP #MLCElections #MVA #MahaVikasAghadi #VidhanParishad #Elections2022 #VidhanBhavan #HWNews